युनिव्हर्सल बॉस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे जगभरातील टी-20 क्रिकेट लीगमध्ये स्वतःचा वेगळा दरारा निर्माण करणाऱया वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. क्रिकेटच्या या छोटय़ा प्रकारात एक हजार षटकार ठोकणारा हा एकमेव क्रिकेटपटू ठरला. विशेष म्हणजे या शर्यतीत एकही फलंदाज ख्रिस गेलच्या आसपासही नाही, हे विशेष.

स्वतःला युनिव्हर्सल बॉस म्हणणाऱया 41 वर्षीय ख्रिस गेलने इंडियन प्रीमियर लीगमध्येही सर्वाधिक 349 षटकार ठोकले आहेत. विंग्ज इलेव्हन पंजाबच्या या फलंदाजाने शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत अबुधाबीमध्ये एक हजार षटकारांचा टप्पा पार केला. आयपीएलचा 13वा हंगाम सुरू होण्यापूर्वी गेलला एक हजार षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी 22 चेंडू मैदानाबाहेर भिरकाविण्याची गरज होती. यंदा सात लढतींनंतर या स्पह्टक फलंदाजाला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र तरीही या नादखुळय़ा खेळाडूने एक हजार षटकारांचा पल्ला गाठण्यात यश मिळविले.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्याच नावावर आहे. यंदाच्या पॅरेबियन प्रीमियर लीगमधून ख्रिस गेलने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. आयपीएलमध्ये तब्बल 4 वेळा या दैत्य फलंदाजाने सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम केलेला आहे. ख्रिस गेलने 2011 मध्ये 44,2012 मध्ये 59, 2013 मध्ये 51, तर 2015 मध्ये 38 षटकार ठोकलेले आहेत. शिवाय 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध ख्रिस गेलने विक्रमी नाबाद 175 धावांची खेळी केली होती. या वादळी खेळीत एका डावात सर्वाधिक 17 षटकार ठोकण्याचा विक्रमही ख्रिस गेलने केला होता. टी-20 क्रिकेटमध्ये एकाच खेळीत सर्वाधिक 18 षटकार ठोकण्याचा विक्रमही याच पॅरेबियन फलंदाजाच्या नावावर आहे. 2017 च्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये त्याने ही करामत केली होती.

अनेक विक्रमांचा धनी

टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल हा फक्त षटकारच नव्हे, तर अनेक विक्रमांचा धनी ठरलाय. सर्वाधिक 13572 धावा, सर्वाधिक 22 शतके, सर्वाधिक 85 अर्धशतके, एका डावात सर्वाधिक 175 धावा, 30 चेंडूंत वेगवान शतक, पराभूत संघाकडून सर्वाधिक 151 धावांची खेळी, एका पॅलेंडर वर्षात (2015मध्ये) सर्वाधिक 1665 धावा, सर्वाधिक 59 वेळा सामनावीराचा बहुमान, एकाच डावात चौकार व षटकाराच्या साह्याने सर्वाधिक 154 धावा असे नानाविध विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहेत.

मानधनात कपात

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करताना ख्रिस गेलने 99 धावांची जबरदस्त खेळी साकारली. पण जोप्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि त्याचे शतक हुकले. यामुळे निराश झालेल्या ख्रिस गेलने बॅट फेपून दिली. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दंड ठोठावण्यात आला. त्याच्या मानधनातून 10 टक्के रक्कम कापण्यात आली.