एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने चिरला अल्पवयीन मुलीचा गळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आंध्र प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीने नकार दिला म्हणून माथेफिरु तरुणाने तिचा गळा चिरून तिचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम भागात वारालक्ष्मी ही मुलगी राहत होती. याच भागात अनिला नावाचा तरुण तिचा पाठलाग करायचा.

अनिलने वारालक्ष्मीला प्रेमाची मागणीही घातली होती. पण वारालक्ष्मीने त्याला नकार दिला. त्याचाच राग मनात धरून अनिलने वारालक्ष्मेच्या गळ्यावर सुरीने वार केला.

या हल्ल्यात वारालक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरोपीला अटक केली आहे. तसेच याबाबत पुढील तपास सुरू आहे.