नितीश कुमार यांच्या नावावर एकही बिहारी मत देणार नाही चिराग पासवान यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप जदयू युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरले आहेत. मोदींच्या रॅपिड सभा आयोजित करण्यात आले आहेत. या सभांवरून लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे.

नितीश कुमार यांना पाहून बिहार मधील एकही नागरिक मत देणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील माहित आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॅपीड सभा घ्याव्या लागत आहेत. बिहार निवडणुकीत खूप मेहनत घेत आहेत असे वक्तव्य चिराग पासवान यांनी केले आहे. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. ” मला कळत नाहीये की भाजप नेते एखाद्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांसमोर एवढे का दुखत आहेत. अशा वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्ते यांच्या मनोबलावर परिणाम होतोय. नितीश कुमार यांना स्वतःला माहित आहे की ते जास्त जागा जिंकू शकत नाही”, असे देखील चिराग पास्वान यांनी यावेळी सांगितले.

एनडीएचा जुना मित्रपक्ष असलेला लोकजनशक्ती पार्टी हा पक्ष बिहार निवडणुकीच्या आधी इंडियातून बाहेर पडला. लोजपा चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री विलास पास्वान यांच्या निधनामुळे पक्षाची धुरा पूर्णतः चिराग पास्वान यांच्याकडे आली आहे चिराग पास्वान यांनी नितीशकुमारांनी सोबत न जाण्याचे ठरवल्याने त्यांचा पक्ष एनडीएतून बाहेर पडला. चिराग पास्वान यांनी युती तोडल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली मात्र पासवान यांनी पंतप्रधान मोदी यांचा मी हनुमान असल्याचे सांगितले होते.