पुणे- आगीत मोबाईल दुकान जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरातील बुधवार पेठेतील मोबाईलच्या दुकानाला काल रात्री आग लागली होती. आगीत दुकान पूर्ण जळून खाक झाले आहे. ही घटना तापकीर गल्लीत समर्थ प्लाझा इमारतीतील दुकानात घडली.

इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर समर्थ मोबाईल विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना काल रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक दुकानातून धूर येत असल्याचे नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलासह पोलिसांना दिली.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. दुकानाचे शटर तोडून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली.

शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही कामगिरी सुनिल नाईकनवरे, जवान आनिल करड फायरमन जगदाळे, बुंदेले, गायकवाड, कारंडे यांनी केली.