
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ तसेच एयरटेल, व्होडाफोन-आयडिया यांच्यापेक्षा बीएसएनएलची व्हॉईस कॉल सेवा सर्वाधिक चांगली आहे. ट्रायच्या अहवालानुसार व्हॉईस कॉल गुणवत्तेत अन्य कंपन्यांना मागे टापून बीएसएनल पहिल्या स्थानावर आहे. माय कॉल अॅपवरील युजर्सच्या फीडबॅकवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
मोबाईल कॉलमध्ये येणारे अडथळे, कॉल ड्रॉपचे प्रमाण यावर आधारित हा अहवाल आहे. युजर्सने दिलेल्या माहितीच्या आधारे व्हॉईस कॉलची गुणवत्ता अभ्यासण्यात आली आहे. यामध्ये बीएसएनएल कंपनी पहिल्या क्रमांकावर तर जिओ आणि व्होडाफोन या कंपन्या दुसऱया स्थानावर आहेत. एयरटेल कंपनी तिसर्या स्थानी आहेत. म्हणजेच ग्राहकांना हायस्पीड डेटा देणाऱया या कंपन्या चांगली कॉल सेवा देण्यात नापास ठरल्या आहेत.
बीएसएनएलला 2014 ग्राहकांनी 5 पैकी 3.4 स्टार रेटिंग दिलेय. रिलायन्स, जिओला आणि व्होडाफोनला 3.3 स्टार मिळाले आहेत. जियोला 10 हजार 292 ग्राहकांनी आणि व्होडाफोनला 3 हजार 408 ग्राहकांनी रेटिंग दिलेय. एअरटेलला 9 हजार 520 सॅम्पलच्या आधारावर 3 स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. त्याचवेळी आयडिया कंपनीला 977 सॅपल्सच्या आधारावर 2.9 स्टार मिळाले आहेत.
प्रवासात जियो त्रासदायक
या अभ्यासात इनडोअर, आऊटडोअर तसेच प्रवासात कॉल सेवा कशी वाटते याची माहिती घेण्यात आली. प्रवासात चांगली कॉल सेवा बीएसएनएलची असल्याचे ग्राहकांनी सांगितले. त्यासाठी बीएसएनएलला 4.4, एअरटेलला 3.3 आणि जियोला 3.2 रेटिंग मिळाले आहेत. सर्व राज्यांतील ग्राहकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
फक्त 60 टक्के युजर्स कॉल क्वालिटीवर समाधानी आहेत.
26 टक्के कॉलची गुणवत्ता वाईट तर कॉल ड्रॉपचे प्रमाण 14 टक्के आहे.
























































