
बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न निवडणुकीपूर्वीच सुटला होता. पण आता राज्यात उपमुख्यमंत्रिपद सुशील कुमार मोदी यांच्याकडे जाणार नसून भाजपमध्ये दोन ज्येष्ठ आणि दिग्गज नेते या शर्यतीत आहेत.
सुशील कुमार मोदी गेली 13 वर्षे उपमुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्याऐवजी ही जवाबदारी इतर नेत्याकडे दिली जाईल असे म्हटले जात आहे.
या शर्यतीत आघाडीवर आहेत प्रेम कुमार. प्रेम कुमार हे गया विधानसाभा मतदारसंघातून 8 वेळा निवडून आले आहेत. आधीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषी खाते होते. आता कुमार उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
त्यानंतर संघाचे जुने नेते कामेश्वर चौपाल यांचेही नाव आघाडीवर आहे. चौपाल हे पाटण्यात पोहोचले आहेत. तसेच पक्ष जी जवाबदारी देतील ती आपण स्विकार करू अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
असे असले तरी सुशील कुमारच उपमुख्यमंत्री राहतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेली १३ वर्षे मोदी उपमुख्यमंत्री आहेत. सुशील कुमार मोदी आणि नितीश कुमार यांची चांगली मैत्री असून कामात दोघांची केमिस्ट्री चांगली आहे. म्हणून सुशील कुमार मोदीच पुन्हा उपमुख्यमंत्री राहतील असेही म्हटले जात आहे.





















































