कोरोनाला लगाम, मुंबईत आठवडाभरात रुग्णसंख्या हजारावरून 409 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या कोरोनाविरोधातील मोहिमांना आता चांगले यश येत असून गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या हजारावरून 409 वर आली आहे. रुग्णांच्या मृत्यूची तसेच ऑक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता 10 हजारच्या खाली आली आहे. कोरोनाला चांगला लगाम बसल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तात्काळ पावले उचलत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. मुंबईत 11 जुलैला रुग्णांची संख्या 1 हजार 308 च्या पुढे गेली आणि नंतर त्यात वाढ होतच राहिली. धारावीत कोरोना रोखण्यासाठी राबवलेल्या ‘मिशन धारावी’चे जगभरात काwतुक झाले. मुंबई महानगरपालिकेच्या ‘चेस द व्हायरस’ आणि ‘मिशन झिरो’ तसेच राज्य सरकारच्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळेही कोरोनाला मोठय़ा प्रमाणात आळा बसला. मुंबईत सोमवारी पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या ही जुलैपासूनची सगळ्यात नीचांकी संख्या होती. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 91 टक्के असून मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग हा 274 दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत 17 लाखांहून जास्त चाचण्या

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढवत नेली. सध्या दरदिवशी 14 हजारांहून जास्त कोरोना चाचण्या होत असून आतापर्यंत मुंबईत कोरोनाच्या 17 लाखांहून जास्त चाचण्या झाल्या आहेत. तर सध्या 2 हजार 3 आयसीयू बेड, 1 हजार 183 व्हेंटिलेटर बेड आणि 8 हजार 695 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत.