
गोव्याच्या माजी राज्यपाल व भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन झाले आहे. जनसंघापासून कार्यरत असलेल्या मृदुला सिन्हा या भाजपच्या प्रभावी नेत्यांपैकी एक होत्या. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे
‘मृदुला सिन्हा या कायम त्यांच्या सामाजिक कार्यासाठी लक्षात राहतील त्या एक उत्तम लेखिका होत्या साहित्य व संस्कृती यात त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित झालो आहे अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहे
गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मृदुला सिन्हा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गोव्याच्या माजी राज्यपाल वरिष्ठ भाजप नेता मृदुला सिन्हा यांच्या निधनाने दुखी झालो आहे त्यांनी कायम राष्ट्र समाज व संघटनेसाठी काम केले आहे त्या एक निपून लेखिका होत्या त्यांच्या लेखनासाठी कायम स्मरणात राहतील
27 नोव्हेंबर 1942 ला बिहार मधील मुजफ्फर येथे मृदुला सिन्हा यांचा जन्म झाला त्या गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांचे पती डॉक्टर राम कृपाल सिंह हे बिहारमध्ये कॅबिनेट मंत्री होते आणि केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या वेळी मृदुला सिन्हा या केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष होत्या
याव्यतिरिक्त त्या लेखिका होत्या त्यांनी आत्तापर्यंत 46 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या एक राणी थी ऐसी या पुस्तकावर चित्रपटही आला होता
























































