स्वर्गाहून सुंदर… जम्मू कश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱया कश्मीरसह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात यंदाच्या मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली आहे. पर्वतरांगा, डोंगरदऱया, रस्ते, गाडय़ा अशा सर्वच ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून तिथल्या अद्भुत सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. बर्फवृष्टीनंतर उत्तर हिंदुस्थानात थंडीचा जोर वाढला आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, पुलू या भागांतदेखील चांगली बर्फवृष्टी झाली असून उत्तराखंडच्या देहरादून, मसूरी तसेच इतर भागांत काल पाऊस पडला आहे. पुढील एक दोन दिवस बर्फवृष्टी सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जवाहर टनलजवळ बर्फवृष्टी आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जम्मू-कश्मीर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी बंद करण्यात आला.