
पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला खंडणी विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून एका पिस्तूलासह काडतूस जप्त करण्यात आले आहे. बाप्पा उर्पâ अभिषेक अपूर्वा कसबे (रा. घोरपडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना मोक्यातील शिक्षा भोगून सुटलेला सराईत गुन्हेगार घोरपडीत पिस्तूल बाळगून उभा असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन अहिवळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बाप्पा उर्फ अभिषेकला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे पिस्तूल आणि एक काडतुस मिळून 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, प्रदीप शितोळे, तूपसुंदर, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ यांच्या पथकाने केली.


























































