मुंबईतील अग्निसुरक्षा नसलेल्या 29 मॉलना पालिकेची नोटीस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेकडून मुंबईतील सर्व 76 मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱया आणि त्रुटी असणाऱया 29 मॉलना नोटीस बजावण्यात आली असून अग्निसुरक्षा यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग नियंत्रणास येण्यास तब्बल 56 तास लागले होते. या ठिकाणी बंद असलेली अग्निशमन यंत्रणा आणि बेकायदा बांधकाम यामुळे आग जास्त वेळ भडकली असल्याचे आरोप स्थायी समितीत करण्यात आले होते. याबाबत स्थायी समितीत दोन वेळा संबंधित आगीबाबत सादर केलेल्या अहवालाबाबत असमाधानही व्यक्त करण्यात आले होते. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मुंबईतील सर्व मॉलमधील आग्निसुरक्षेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. दरम्यान, 29 मॉलमध्ये अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष आणि त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नोटीस दिल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.

या मॉलना बजावली नोटीस

  • सीआर 2, नरिमन पॉईंट
  • सिटी सेंटर, नागपाडा
  • नक्षत्र, दादर
  • डी.बी., जुहू
  • रिलायन्स रिटेल लि., सांताक्रूझ
  • मिलन, सांताक्रूझ (प.)
  • केनी वर्थ शॉपिंग सेंटर खार
  • ग्लोबल प्रा.लि. वांद्रे n सुब्रिया, वांद्रे
  • टिंथ सेंटर, कांदिवली
  • गोकूळ शॉपिंग सेंटर बोरिवली
  • देवराज मॉल बिल्डिंग, दहिसर
  • रिलायन्स, बोरिवली
  • सेंटर प्लाझा, मालाड
  • के. स्टार, चेंबूर
  • ठाकूर मुव्ही अँड शॉपिंग सेंटर कांदिवली
  • अँनेक्स मॉल कम थिएटर कांदिवली
  • क्युबिक, चेंबूर
  • द मॉल मालाड
  • हायको मॉल बिल्डिंग पवई
  • ड्रीम, भांडूप
  • विष्णू शिवम, कांदिवली
  • साई कृपा, दहिसर
  • इस्टन प्लाझा, मालाड
  • हाय लाईफ प्रिमाईसीस सांताक्रूझ
  • द झोन, बोरिवली, 27) गारुर अँड वेल इंडिया लिमिटेड कांदिवली, 28) गोकुळ शॉपिंग आर्पिडीया बोरिवली, 29) रिलायन्स, वांद्रे