ठाण्यात मनसेच्या 43 कार्यकर्त्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परवानगी नसतानाही वीजबिलवाढीविरोधात आज मनसेच्या कार्यकत्र्यांनी आंदोलन करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले. ठिकठिकाणी आंदोलन छेडून कार्यकर्त्यांचा जीवदेखील धोक्यात घातला. तसेच पोलिसांबरोबरही झटापट झाली.

या आंदोलनप्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव तसेच स्थानिक नेते अभिजित पानसे यांच्यासह 43 जणांना अटक करण्यात आली. नौपाडा येथील मनसेच्या कार्यालयाबाहेर मोर्चासाठी गर्दी झाली. त्यामुळे प्रचंड वाहतूककाsंडी झाल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला.