
सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज आणखी स्वस्त झाली आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एसईसीआय) नुकतेच 1070 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत टेंडर मागवले होते. त्यानुसार सौदी अरेबियाच्या आलजोमिया एनर्जी आणि ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी 600 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार होणारी वीज केवळ दोन रुपये प्रतियुनिट दराने तर एनटीपीसीने 470 मेगावॅटचे प्रकल्प उभारून 2 रुपये 1 पैसे प्रतियुनिट दराने एसईसीआयला वीज पुरवण्याबाबत करार केला आहे.
केंद्रीय ऊर्जा विभागाने 20302 पर्यंत देशात पावणे दोन लाख मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलर एनर्जी का@र्पेरेशनने 1070 मेगावॅट क्षमतेचे राजस्थानमध्ये सौर प्रकल्प उभारण्याबाबत नुकतेच टेंडर काढले होते. अलजोमिया एनर्जी आणि ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जीला प्रत्येकी 200 आणि 400 मेगावॅट सौर प्रकल्पाचे टेंडर मिळाले आहे.
वाढत्या स्पर्धेमुळे दर खालावला
.देशात मोठय़ा प्रमाणात सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे सौर प्रकल्प उभारण्याचे जास्तीत जास्त काम आपल्यालाच मिळावे म्हणून अलजोमिया, ग्रीन विंड एनर्जी आणि एनटीपीसीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार होणारी वीज कमी दराने एसईसीआयला पुरवण्याबाबत करार केला असल्याचे मत ऊर्जा क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
































































