
टॉप्स ग्रुपने एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमित चांदोरे यांना सत्र न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कंत्राटात टॉप्स ग्रुपकडून घोटाळा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे पुरावेच नाहीत. त्याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात ईडीला अपयश आल्याने चांदोरे यांना पोलीस कोठडी ऐवजी 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोठडीची मुदत संपल्याने अमित चांदोले यांना रविवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात यावी अशी मागणी ईडीच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यावेळी ईडी च्या वतीने ?ड कविता पाटील यांनी बाजू मांडली त्यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कथित घोटाळ्यातून अमित चांदोले व आमदार प्रताप सरनाईक यांना निम्मा मोबदला मिळाला असून गेल्या सहा वर्षात चांदोले आणि सरनाईक यांना सुमारे सात कोटी रुपये नफा झाल्याचा दावा ईडी ने सत्र न्यायालयात केला आहे. मात्र चांदोले यांच्या वतीने बाजू मांडणा?dया वकिलांनी ईडी चा हा युक्तीवाद फेटाळून लावत ईडी च्या या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले. एवढेच काय तर घोटाळा झाल्याचे अद्याप स्पष्ट नसताना चुकीच्या पद्धतीने आपल्या अशीलाला अटक करण्यात आल्याचे चांदोले यांच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले. तसेच या प्रकरणी नोटीस बजावणे अपेक्षित होते परंतु ती नोटीस न पाठवताच अटक केल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.
अमित चांदोरे यांना न्यायालयीन कोठडी, ईडीचा दावा फेटाळला
कंत्राटात घोटाळा झाल्याचे पुरावे ईडी कोर्टात सादर करू शकलेली नाही त्यावेळी ईडीने युक्तिवाद करताना चांदोले आणि इतर काही व्यक्तींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी चांदोले याची पोलीस कोठडी मागितली परंतु न्यायालयाने ईडी चा हा युक्तिवाद फेटाळून लावला एवढेच नव्हे तर ईडीचे हे कारण पोलीस कोठडीसाठी पुरेसे नसल्याचेही कोर्टाने ईडीला सुनावले.



























































