कोरोनातही आयआयटी मुंबईची कोटी कोटी उड्डाणे, विद्यार्थ्याला 1 कोटी 3 लाखांच्या पगाराची ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि  संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईने ऐन कोरोनाच्या काळात देखील आपल्या कोटी कोटी उड्डाणे कायम ठेवली आहेत. आयआयटी मुंबईतील बहुचर्चित प्लेसमेंट प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी आयआयटीन्सला वर्षासाठी 1.57 लाख युरो म्हणजेचे 1 कोटी 38 लाख रुपयांच्या भरगच्च पगाराची ऑफर देऊ केली आहे.

ऑप्टीवर या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही ऑफर देऊ केली असून हिंदुस्थानी कंपनीमध्ये क्वॉलकॉमने 46.41 लाख रुपयांचा भरगच्च पगाराची नोकरी देऊ केली आहे.

मुंबईसह जगभरात आयआयटी मुंबईने आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. त्यामुळे दरवर्षी आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट प्रक्रियेकडे उभ्या जगभरातील कंपन्यांचे लक्ष लागून राहते. यंदा कोरोनामुळे नेमक्या किती कंपन्या या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग नोंदवितात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

अखेर या प्लेसमेंट प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी एकूण 18 कंपन्यांनी यात भाग घेतला होता. ज्यात मायक्रोस्फॉट, गुगल, बोस्टन, क्वॉलकॅम, अॅपेल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनींचा समावेश होता.

 

आयआयटी मद्रासमध्ये 123 विद्यार्थ्यांना ऑफर्स

आयआयटी मद्रासमध्ये पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 123 विद्यार्थ्यांना ऑफर्स मिळाल्या आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, बजाज ऑटो, इस्रो या कंपन्यांचा समावेश होता. येथे मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक 19 तर इस्रोने 10 ऑफर्स दिल्या आहेत. आयआयटी मद्रासमध्ये यंदा सुमारे 256 कंपन्यांनी नोंदणी केली असून यात 71 स्टार्टअप्सचा समावेश आहे.

 

कोणत्या कंपनीने दिले भरगच्च पगार

कंपनी           पगार (प्रति वर्ष)

ऑप्टीवर (आंतरराष्ट्रीय)   1.57 लाख युरो

क्वॉलकॉम          46.41 लाख रुपये

वर्ल्ड कॉन्ट        39.70 लाख रुपये

मॉरगन स्टेनली  37.25 लाख रुपये

उबर                35.25 लाख रुपये