
शिवसेनेची अंगीकृत संघटना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची पुनर्बांधणी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार एक अस्थायी समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे – विजय मालणकर, अशोक शेंडे, राजू पाटील, निखिल सावंत, वनिता पटेल, देविदास माडये आणि राजेश पुचिक. ही समिती ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्प साधून कक्षाची बांधणी करतील. जेणेकरून ग्राहकांना सेवा देताना शिवसेना पक्षाच्या प्रसार व प्रचाराचे कार्यही जोमाने होईल.
तसेच ही समिती पक्षनेतृत्वाकडून वेळोवेळी दिलेले आदेश व जबाबदाऱया यांची पूर्तता करील. समितीकडून केलेल्या कार्याचा लेखाजोखा मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येईल.
दरम्यान, या अस्थायी समितीच्या कार्याचा आढावा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.






























































