टी-20 वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून, हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार पहिला सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 2021 सालामध्ये हिंदुस्थानात आणि 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. यामुळे उद्यापासून सुरू होणारी उभय देशांमधील मालिका ही दोन वर्ल्ड कपची रंगीत तालीम आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. टीम इंडियाचा संघही टी-20 मालिका जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास संपादन करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. ऑस्ट्रेलियन संघ मात्र वन डे मालिकेनंतर टी-20 मालिकाही खिशात घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील.

न्यूझीलंडमध्ये निर्भेळ यश

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने कोरोनाआधी झालेल्या अखेरच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला होता. टीम इंडियाने न्यूझीलंडला 5-0 अशा फरकाने त्यांच्याच देशात धूळ चारली होती. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानी संघ जास्त क्रिकेट खेळलेला नाहीए. पण या मालिकेचा निकाल हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावले यात शंका नाही.

या आकडेवारीवर एक नजर

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत 20 टी-20 सामने झाले आहेत. यापैकी 11 सामने हिंदुस्थानने तर आठ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. आकडेवारीवर नजर टाकता हिंदुस्थानचे पारडे जड दिसून येत आहे. मात्र दोन देशांमध्ये हिंदुस्थानात पार पडलेल्या मागील मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशा फरकाने विजय संपादन केला होता.

– 2019 सालापासून टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीत सर्वोत्तम सरासरी राखण्यात यशस्वी ठरला आहे.

बॅलन्स संघ

टी-20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचा संघ बॅलन्स म्हणजेच संतुलित वाटतो. शिखर धवन, लोकेश राहुल सलामी फलंदाज म्हणून खेळतील. कर्णधार विराट कोहली तिसऱया क्रमांकावर तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करील. जसप्रीत बुमराहसोबत सलामीला कोणता गोलंदाज गोलंदाजी करील हे उद्याच समजेल. दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन या गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पांडय़ा व रवींद्र जाडेजाकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. हार्दिक पांडय़ा किती षटके गोलंदाजी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. संजू सॅमसनही संधीच्या प्रतीक्षेत आहे.

उभय संघ खालीलप्रमाणे

n हिंदुस्थान – शिखर धवन, लोकेश राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.
n ऑस्ट्रेलिया – अॅरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, स्टीवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लॅबुशेन, डॅनीयल सॅम्स, केन रिचर्डसन, मोयसेस हेन्रीक्स, अॅलेक्स पॅरी, अॅश्टन अॅगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्प, मार्पस स्टोयनीस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, डार्सी शॉर्ट.

– या खेळपट्टीत दडलंय काय…

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला टी-20 सामना पॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे होणार आहे. या स्टेडियममधील खेळपट्टीवर आतापर्यंत धावांचा पाऊस पडलाय. इतिहास हेच सांगतोय. उद्याच्या लढतीतही याचीच पुनरावृत्ती बघायला मिळेल यात शंका नाही. बिग बॅश लीगमधील लढतींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास येथे 8.56च्या सरासरीने धावा फटकावल्या जात आहेत. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यामध्ये येथे झालेल्या लढतीत यजमान कांगारूंनी 151 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

आजची पहिली टी-20 लढत

हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया, पॅनबेरा
थेट प्रक्षेपण सोनी वाहिनीवर
दुपारी 1.40 वाजता
(हिंदुस्थानी वेळेनुसार)