पत्ता विचारण्याचा बहाण्याने दीड तोळ्याची सोन्याची साखळी लांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

परभणीत पत्ता विचारण्याचा बहाणा करीत ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी एकाने लांबवली. दुपारी अडीचच्या सुमारास त्रिमूर्तीनगरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार त्रिमूर्तीनगरातील ज्येष्ठ नागरिक जोशी हे आज घरा समोर उभे दोन व्यक्ती तेथे आले. त्यातील एक व्यक्ती गाडीवर होता. तर दुसर्‍या एकाने त्यांच्याशी बोलू लागला. जोशी यांचे लक्ष विचलीत करून त्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी हातोहात लंपास केली.

अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने जोशी भांबावून गेले. आरडाओरड केली परंतू ते दोघेही सोनसाखळी चोर भरधाव वेगाने फरार झाले. त्यानंतर. जोशी यांनी नानलपेठ पोलिसांशी संपर्क करून तक्रार दाखल केला.