
अंतराळातून पृथ्वीवर एक स्पेशल डिलीव्हरी आली आहे. जपानचे हयाबुसा 2 हे अंतराळ यान 30 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या अॅस्टेरॉईड रीयूगूवरून धूळ घेऊन आज पृथ्वीवर परतले आहे. यामुळे जीवसृष्टी आणि विश्वाचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरून धूळ आणणे हा विज्ञानाच्या जगातला मोठा पराक्रम आहे.
जपानची स्पेस एजंसी जाक्साने दिलेल्या माहितीनुसार, हायाबुसा 2 कॅप्सूल रीयुगूवरून सॅम्पल घेऊन दक्षिण ऑस्ट्रेलियात उतरले आहे. आम्हाला कॅप्सूल आणि पॅराशूट दोन्ही मिळाले आहेत. पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करतानाचे व्हिडियो देखील आम्ही टिपले आहेत. हायाबुसा 2 मिशन डिसेंबर 2014 मध्ये लॉंच केले होते. 2018 मध्ये हायाबुसा 2 ने पृथ्वीपासून 30 कोटी किमीवर असलेल्या रीयुगू या लघुग्रहावरून धूळ उचलली आहे.
- जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजंसीच्या माहितीनुसार, धूळीचे नमूने पोहोचवण्यासाठी हायाबुसा 2 यानने शनिवारी यशस्वीरीत्या छोटे कॅप्सूल पृथ्वीच्या दिशेने पाठवले आहे. यात 0.1 ग्रॅम धूळ असेल. याच्या मदतीने जीवसृष्टीचे रहस्य उलगडण्यास मदत होईल. 460 कोटी वर्षांपूर्वी सौरमंडल बनले तेव्हा ते कसे होते आणि लघुग्रहांचा उगम सौरयंत्रणेत कसा झाला, त्याचा पृथ्वीशी काही संबंध आहे का, याविषयीदेखील महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. कारण येथे स्पेस रेडिएशन आणि दुसऱया घटकांचा प्रभाव नसतो.
- रियुगूमधील मातीमधून शास्त्र्ाज्ञांना सेंद्रिय घटकांचे विश।sषण करावे लागेल, असे माकोटो योशिकावाच्या प्रोजेक्ट मॅनेजरने सांगितले आहे.
- रविवारी पहाटे पृथ्वीपासून 120 किमी अंतरावरील वायूमंडळात प्रवेश करताना या कॅप्सूलने काहीकाळ फायरबॉलमध्ये रुपांतर केले. जमिनीपासून 10 किमी अंतरावर असताना पॅराशूट उघडले गेले. जेणेकरून पृथ्वीवर येताना त्याचा वेग कमी असेल आणि लँडिंगची माहिती मिळू शकेल.
























































