सौदीच्या शास्त्रज्ञांनी तयार केली कृत्रिम त्वचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरब देशातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटीने कृत्रिम त्वचा तयार केली आहे. ही त्वचा पाच हजार वेळा स्वत:ला दुरुस्त करू शकते. ती मानवी त्वचेसारखी संवेदनशील आहे.

कोणतीही त्वचा स्पर्शाला किंवा कमी जास्त तापमानाला संवेदनशील असणं जरुरी असते. किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली त्वचा इलेक्ट्रॉनिक त्वचा आहे. ती एका सेकंदापेक्षा कमी वेळेत स्वत:ला दुरुस्त करू शकते. तसेच 8 इंच अंतरावरून दुसऱया वस्तूचा स्पर्श अनुभवू शकते.

शास्त्रज्ञ डॉ. काइ यांच्या मते, 2 डी सेन्सरच्या प्रयोगाने कृत्रिम त्वचेला पातळ आणि मजबूत बनवता येते. त्यामुळे ती दीर्घकाळ टिकते. या त्वचेत नॅनो वायरदेखील लावण्यात आली आहे.

रक्तदाबावर ठेवते लक्ष

कृत्रिम त्वचेचा उपयोग कृत्रिम अवयवांमध्ये होऊ शकतो. ही त्वचा शरीरात होणाऱया छोटय़ा छोटय़ा बदलांवरदेखील लक्ष ठेवू शकते. उदाहरणार्थ, रक्तदाबातील चढ उतार. कृत्रिम त्वचा हा डेटा स्वतŠच्या आत स्टोअर करून ठेवते आणि वायफायच्या मदतीने माणसांपर्यंत पोचवते.