
दारूची बाटली फेकून का मारली असे विचारत दोघाजणांनी तरूणावर तलवारीने वार केला.ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री रात्री साडेदहाच्या सुमारास खडकीतील स्टार हॉटेलपरिसरात घडली.
रणजित किसन जाधव (वय 47, रा. खडकी बाजार) आणि अनिकेत रणजित जाधव (वय 18) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिकेत उर्पâ चिंट्या पवार (वय 19, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत आणि त्यांचा मित्र वसिम शेख स्टार हॉटेलमध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपी रणजित आणि अनिकेतने त्यांना किरकोळ कारणावरून जाब विचारला. त्यानंतर दोघांनी त्यांना धक्काबुक्की करून तलवारीने वार केला. याप्रकरणी खडकी पोलिस तपास करीत आहेत.
























































