रिद्धीमान साहाचे अर्धशतक, तीनदिवसीय सराव सामना ड्रॉ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन्स व ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यामध्ये पार पडलेला तीनदिवसीय सराव सामना अखेर ड्रॉ राहिला. या लढतीच्या अखेरच्या दिवशी दोन घटनांनी तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले. यामधील पहिली घटना होती यष्टिरक्षक रिद्धीमान साहा याने दमदार अर्धशतक झळकावत पहिल्या कसोटीआधी आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आणि अॅडलेड कसोटीतील स्थान जवळपास निश्चित केले. युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीच्या बाऊन्सवर ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्कीला झालेली दुखापत. ही दुसरी घटना होती. या दुखापतीमुळे विल पुकोवस्कीचे पहिल्या कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघाने मंगळवारी दुसरा डाव 9 बाद 306 या धावसंख्येवर घोषित केला. पॅमरून ग्रीनने नाबाद 125 धावा तडकावल्या. इंडियन्स संघाकडून उमेश यादव व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. पहिल्या डावात 247 धावा तडकावणार्या इंडियन्स संघातील फलंदाजांना दुसऱया डावात आपला ठसा उमटवता आला नाही. पृथ्वी शॉ (19 धावा), शुभमन गिल (29 धावा), हनुमा विहारी (28 धावा), अजिंक्य रहाणे (28 धावा) यांनी सुरुवात आश्वासक केली. पण मोठी खेळी त्यांना उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. यावेळी रिद्धीमान साहाने 100 चेंडूंत सात चौकारांसह नाबाद 54 धावा तडकावत लय मिळवली. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून मार्प स्टेकटी याने 37 धावा देत 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंडियन्स संघाने 9 बाद 189 धावांवर दुसरा डाव घोषित केला.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघासमोर विजयासाठी 15 षटकांमध्ये 131 धावांचे आव्हान उभे ठाकले होते. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने 15 षटकांमध्ये 1 बाद 52 धावा केल्या. विल पुकोवस्की 23 धावा काढून दुखापतीमुळे पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्क्स हॅरीसने नाबाद 25 धावा केल्या.

कनकशनची सौम्य लक्षणे

युवा गोलंदाज कार्तिक त्यागीचा चेंडू विल पुकोवस्कीच्या हेल्मेटवर आदळला. यानंतर तो 90 सेकंद मैदानावरच बसला. त्यानंतर डॉक्टरांच्या सहाय्याने त्याने मैदान सोडले. मेंदूला दुखापत झाल्यामुळे कनकशनची सौम्य लक्षणे त्याला जाणवू लागली आहेत. त्यामुळे अॅडलेड येथील पहिल्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजिंक्य रहाणेची खिलाडूवृत्ती

कार्तिक त्यागीचा चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर जखमी झालेल्या विल पुकोवस्कीला मैदान सोडावे लागले. तिसऱया दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंडियन्स संघाच्या अजिंक्य रहाणे याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन विल पुकोवस्कीच्या प्रपृतीची विचारपूस केली. याप्रसंगी अजिंक्य रहाणेने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे चोहोबाजूंनी काैतुक होत आहे.