Video – सापाने केली वटवाघळांची शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडाच्या झाडावर असलेल्या वटवाघळांच्या पिलांची शिकार करण्यासाठी धामण सापाने थेट झाडावर चढाई केली. ही चढाई करताना त्याला अर्धा तास लागला. त्यानंतर घरट्यात असलेल्या वटवाघळांच्या पिलांची सापाने मोठ्या शिताफीने या सापाने शिकार केली. साधारणतः एक तास चाललेला हा शिकारीचा थरार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात लोकांनी अनुभवला. धामण जातीचा साप तसा बिनविषारी असतो. पडक्या घरात, गोदामात, लाकडांच्या राशीत हा साप हमखास आढळून येतो. धामण सापाचे आवडते खाद्य उंदीर आहे.

परिसरानुसार हा साप शिकारीत बदल करीत असतो. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील शिवाजी चौकात मोठे वडाचे झाड आहे. या झाडावर वटवाघळांनी डेरा टाकला. झाडातील एका पोकळीत वटवाघळांची पिल्ले होती. या पिलांवर धामण सापाची नजर गेली. साधारणतः वीस- पंचवीस फूट उंचीवर असलेल्या वटवाघळांची शिकार करण्यासाठी सापाने झाडावर चढाई सुरू केली. अर्ध्या तासांनी तो वटवाघळांजवळ पोहचला आणि मोठ्या शिताफीने त्याने वटवाघळांची शिकार केली. वर्दळीच्या चौकातच हा थरार घडत असल्याने बघ्यांची एकच गर्दी उसळली. गर्दीला न घाबरता सापाने आपले सावज टिपले.