राज्यात पर्यटन विकासातून रोजगार निर्मितीला चालना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात खूप सुसंधी आहेत. राज्यात पर्यावरणाचे रक्षण,त्याचबरोबर उद्योगांना चालना आणि पर्यटन विकासास प्रोत्साहन देण्यात येत आहे. कोरोनोत्तर काळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या या क्षेत्राला चालना देईल अशी ग्वाही राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहयोगाने आदरातीथ्य व्यवसायातील विविध खाजगी संस्थांचा सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. यावेळी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे,पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह,एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील,पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर यांच्यासह विविध नामांकित हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले होते.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी परवान्यांची संख्या 70 वरुन 10 पर्यंत कमी केली आहे. राज्याचे पृषी पर्यटन धोरण,बीच शॅक धोरणही जाहीर केले आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत राज्यातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देऊन स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आदित्य ठाकरे म्हणाले.