राहुलच्या फलंदाजीवर लारा फिदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज ब्रायन लारा सध्या लोकेश राहुलच्या फलंदाजीवर भलताच फिदा झालाय. हिंदुस्थानचा हा फलंदाज सध्या क्रिकेट विश्वातील माझा सर्वात आवडता फलंदाज होय. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी पैसे मोजायचीही आपली तयारी असेल, अशा शब्दांत लाराने राहुलवर स्तुतिसुमने उधळली.

ब्रायन लारा व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग एका क्रिकेटिंग चॅनलवर चर्चा करत होते. यावेळी पॉण्टिंगने लाराला सध्याचा आवडता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कोण, असा सवाल केला. लाराने लागलीच लोकेश राहुलचे नाव घेतले. राहुलची फलंदाजी बघायला खूप आवडते. खास करून टी-20 क्रिकेटमध्ये. राहुल एक आक्रमक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. तो कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी ठरणार आहे. मात्र, टी-20 क्रिकेटमधील त्याचा खेळ पाहण्याची मजा काही औरच असते, असेही लाराने सांगितले.