
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात रविवारी दिवसभरात 3 हजार 83 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 93.44 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 717 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी अनेक मोहिमांबरोबरच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रविवारी दिवसभरात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.56 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 17 लाख 2 हजार 457 चाचण्या झाल्या असून 18 लाख 80 हजार 416 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 5 लाख 12 हजार 587 जण होम कोरेंटाईन असून 4 हजार 403 जण संस्थात्मक कोरेंटाईन आहेत.






























































