यूट्यूबसह गुगलचे अनेक अ‍ॅप्स झाले डाउन, ट्विटरवर ट्रेंड सुरू…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात सोमवारी सायंकाळी यूट्यूब आणि जी-मेलसह गुगलचे सर्व अ‍ॅप्स डाउन झाले आहेत. यानंतर बऱ्याच लोकांनी ट्वीट केले आहे की, गुगलचे अ‍ॅप्लिकेशन डाउन होत आहे.

हिंदुस्थानात केवळ यूट्यूब आणि जी-मेलच नव्हे तर गुगल ड्राईव्ह, गुगल मीट यासारख्या अनेक महत्त्वाच्या अ‍ॅप्सची सेवाही खंडित झाली आहे. लोक गूगल डाउन हॅशटॅगसह ही माहिती शेअर करत आहेत. यामुळे ट्विटरवर #googledown आणि यूट्यूब डाउन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

गुगलच्या या सेवा खंडित झाल्यामुळे लोकांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान मात्र गुगल सर्च इंजिन (google.com) सतत कार्यरत आहे. कदाचित सर्व्हर डाऊनमुळे गुगलच्या अॅप्सना ही समस्या आली असेल, असा लोक अंदाज व्यक्त करत आहेत.