
कोल्हापूरहून गणपतीपुळ्यात आलेले दोन पर्यटक मंगळवारी समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना बुडाले. या बुडणाऱ्या या पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले. पोहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते समुद्रात बुडू लागले. त्यांनी वाचवा वाचवा असा आरडाओरडा केला.
त्यांचा आवाज ऐकताच किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी ट्युब समुद्रात फेकत पाण्यात उड्या घेतल्या. बुडणाऱ्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. आशिष माने, अक्षय माने, महेश देवरुखकर, अनिकेत राजवडकर आणि प्रफुल्ल पाटील या जीवरक्षकांनी त्या दोन पर्यटकांचे प्राण वाचवले.



























































