
नागरिकांनो सावधान तुम्ही जर मोटारीतून एकटे जात असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या मोटारीवर सिमेंटचा ब्लॉक मारून काच फोडून मुद्दामहून भांडण करीत लुट केली जाऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात घडला आहे. सिमेंटचा ब्लॉक फेकून मोटारीची काच टोळक्याने फोडली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी आलेल्या तरूणाला टोळीने ब्लॉक मारून गंभीर जखमी करून लुटमार केली आहे. मात्र, वेळीच दत्तवाडी पोलिस पोहोचल्यामुळे तरूणाचा जीव वाचला आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी उमेशकांत कुमार गौतम उर्पâ उभ्या (वय -22, रा. वडगाव बुद्रूक), शंकर उर्पâ कोळ्या नाना राउत (वय – 18, रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. अरूण रंगनाथ लांडे (रा. हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात काल अरूण मोटारीतून चालले होते. त्यावेळी रात्री अडीचच्या सुमारास उमेशकांत आणि शंकर यांनी एका अल्पवयीनाच्या मदतीने अरूणच्या मोटारीवर सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला. त्यामुळे त्यांच्या मोटारीची काच फुटल्यामुळे ते खाली उतरून तिघांकडे गेले.
त्यावेळी तिघा आरोपींनी अरूण यांनाच शिवीगाळ करून त्यांच्याकडीत रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अरूण यांनी विरोध केला असता, टोळक्याने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दत्तवाडी पोलिस परिसरात गस्त घालत होते. त्यांनी टोळक्याचा पाठलाग करून त्यांना अटक केली.
लुटमार करण्याच्या उद्देशाने सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात टोळक्याने तरूणाच्या मोटारीची काच फोडली. त्यामुळे जाब विचारण्यासाठी आलेल्या वाहनचालकाच्या डोक्यात ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. मात्र, त्याचवेळी दत्तवाडी पोलिसांनी टोळीचा पाठलाग करून अल्पवयीनासह तिघांना अटक केली आहे, अशी माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सर्वेश धुमाळे यांनी दिली.



























































