2027 मधील एएफसी आशियाई कपच्या आयोजनासाठी हिंदुस्थानने लावली बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपचे यशस्वी आयोजन केल्यानंतर महिलांच्या 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपसाठी सज्ज होत असलेल्या हिंदुस्थानात 2027 सालामध्ये एएफसी आशियाई कप ही स्पर्धाही आयोजित करण्यात येऊ शकते. अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनकडून या स्पर्धेच्या आयोजनासाठी बोली लावण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळवण्यासाठी हिंदुस्थानसह इराण, कतार, सौदी अरेबिया व उझबेकिस्तान या देशांमध्येही चुरस लागली आहे.

दरम्यान, 2030 सालामध्ये होणाऱया आशियाई गेम्सच्या आयोजनाचा मान कतार देशाची राजधानी दोहा या शहराला मिळाला आहे. तसेच 2034 सालामध्ये होणाऱया आशियाई गेम्सचा थरार सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे रंगणार आहे. ऑलिम्पिक काऊन्सिल ऑफ आशियाकडून गुरुवारी याबाबतची घोषणा करण्यात आली.