नरभक्षक बिबट्याचा करमाळा परिसरात खात्मा, अखेर गोळ्या घालून केले ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला करमाळा तालुक्यातील वांगी गावाजवळ गोळ्या घालून ठार  मारण्यात आले.

मागील काही दिवसात या नरभक्षक  बिबट्याने आष्टी तालुक्यात धुमाकूळ घातला  होता. परंतू त्याला पकडण्यासाठी वानविभागास अपयश आले होते. त्यानंतर बिबट्याने त्याचा मोर्चा करमाळा तालुक्यात वळवला होता, त्या ठिकाणी देखील बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

died-leopard2

बिबट्याला ठार मारावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळल्यानंतर करमाळा तालुक्यात वानविभाग आणि  पुणे येथील शार्प शूटर टीम तळ ठोकून होते.

अखेर अनेकांचे 11 जणाचा जीव घेणाऱ्या बिबट्याला आज वन विभाग आणि शार्प शूटरच्या मदतीने गोळ्या घालण्यात आले आणि या नरभक्षक बिबट्याचा अखेर अंत झाला.

died-leopard

करमाळा तालुक्यातील वांगी क्रं.4 येथे रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या शेतात त्याला ठार मारण्यात आले. संभाजीनगर, नगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात या नरभक्षक बिबट्याने 11 लोकांचा बळी घेतले होते. आज सकाळी पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती.

आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे ज्वारीच्या पिकास पाणी देत असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने पंचायत समिती सदस्याच्या पतीवर हल्ला केला होता. त्यात  त्यांचा मृत्यू झाला होता.

किन्ही येथे आजीआजोबा सोबत तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या स्वराज्य भापकर  या चिमुकल्यावर अचानक  बिबट्याने हल्ला करून ठार मारले. तसेच शनिवारी रात्री सहाच्या सुमारास मंगरूळ येथे या बिबट्याने मायलेकावर हल्ला केला. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.

ही घटना होताच अवघ्या काही तासातच पारगाव (जो.) येथील शालनबाई शाहजी भोसले या गवत आणण्यासाठी शेतात गेल्या असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला होता. त्याच दिवशी  संध्याकाळी  सहा वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून  ठार केल्याची घटना  होती. या घटनांनी तालुक्यातील नागरिक भयभीत होते.

died-leopard3

बिबट्याला ठार केल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. गुरूवारी सायंकाळी हा बिबट्या बिटरगाव मध्ये आढळून आला होता हा बिबट्या उजनीच्या काठावरून परत आल्या मार्गाने निघाला होता. गेल्या तीन दिवसांपासून त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता.

त्याला उजनीच्या पाण्यामुळे पुढे जाण्यास अडचण निर्माण होत होती त्यामुळे तो परत मागे आल्या रस्त्याने फिरला होता असे वन विभागाच्या सूत्रानुसार समजते.