चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, रुग्णांच्या संख्येत घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी चंद्रपुरातून. चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदवले आहे. मागील महिन्यात दररोज सरासरी अडीचशेवर असलेला रुग्णांचा आकडा या महिन्यात झपाट्याने कमी होत आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 95 एवढी असून, ऍक्टिव्ह रुग्ण केवळ 747 आहेत. ही रुग्णसंख्या येत्या काही दिवसात झपाट्याने कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 21 हजारांवर रुग्ण होते. त्यातील केवळ 747 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. इतर सर्व रुग्ण बरे झाले आहेत.

ही संख्या वेगाने कमी होत असल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालये रिकामी झाली असून, आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. येत्या काही दिवसात कोरोनवरील लस येण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र त्यापूर्वीच रुग्णांच्या आकडेवारीत झालेली घट आरोग्य यंत्रणेचा आनंद वृद्धिंगत करणारी ठरली आहे. ही सुस्थिती बघता चंद्रपूर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा दृढविश्वास व्यक्त होत आहे.