गाईच्या शेणापासून वेदिक पेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता गाईच्या शेणापासून बनवलेला ‘वेदिक पेंट’ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वेदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. वेदिक पेंट हे डिस्टेंपर आणी इमल्शन अशा दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. हा रंग पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, अॅण्टी बॅक्टेरिअल, अॅण्टी फंगल आणि वॉशेबल आहे. रंगरंगोटी झाल्यावर केवळ 4 तासांत रंग सुकेल. तसेच, वेदिक पेंटमुळे पशुधन विक्री क्षेत्रातील शेतकऱयांच्या वार्षिक उत्पन्नात अंदाजे 55 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.