हिंदुस्थान 9 पदकांसह दुसऱ्या स्थानी, अखेरच्या दिवशी सिमरनजीत, मनीषाचा ‘सुवर्ण’पंच जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर्मनीतील कोलोन शहरात झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत हिंदुस्थानने 9 पदकांसह दुसरे स्थान पटकाविले. अखेरच्या दिवशी सिमरनजीत काैर व मनीषा यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. हिंदुस्थानने या स्पर्धेत 3 सुवर्णांसह 2 रौप्य व 4 कास्यपदकाची कमाई केली.

महिलांच्या 57 किलो गटाच्या अंतिम लढतीत मनीषा व साक्षी या दोन हिंदुस्थानी प्रतिस्पर्धी आमने-सामने होत्या. त्यामुळे सुवर्णपदक हिंदुस्थानलाच मिळणार हे निश्चित होते. त्यात मनीषाने चुरशीच्या लढतीत 3-2 गुणांनी बाजी मारून सुवर्णपदकावर नाव कोरले. दुसरीकडे सिमरनजीत काैर हिने यजमान जर्मनीच्या माया कालीनहंस हिचा 4-1 गुण फरकाने धुव्वा उडवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या दोघींच्या आधी पुरुष गटात अमित पंघालने 52 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. अंतिम लढतीत प्रतिस्पर्धी बॉक्सरने माघार घेतल्याने अमितला सुवर्णपदक बहाल करण्यात आले.

हिंदुस्थानी पदक विजेते

  • सुवर्ण – अमित पंघाल (52 किलो), सिमरनजीत काwर (60 किलो), मनीषा (57 किलो).
  • रौप्य – सतीश कुमार (91औ किलो), साक्षी (75 किलो).
  • कास्य – सोनिया लाठर (57 किलो), पूजा राणी (75 किलो),
  • jermanyगौरव सोलंकी (57 किलो), मोहम्मद हसमुद्दीन (57 किलो).