पेट्रोल पंप, बेकरी, ज्वेलरी कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; दादर, माहीम, धारावीत विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दुकानदार आणि फेरीवाल्यांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित केल्यानंतर आता दादर, माहीम आणि धारावीत पेट्रोल पंप, बेकरी, ज्वेलरी, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी आजपासून विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही मोहीम 29 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून एपूण 5 ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘चेस द व्हायरस’, ‘मिशन झीरो’ तर राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमा राबवत कोरोनावर नियंत्रण मिळवले. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीचा भाग असलेल्या धारावीसह दादर, माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र तरीही कोरोनाचा एकही संशयित रुग्ण मागे राहू नये यासाठी पालिका प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आता लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱया पेट्रोल पंप, बेकरी, ज्वेलरी बनवणारे आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समधील कर्मचाऱयांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱयाने दिली.

मेट्रो कामगारांच्या उद्या चाचण्या

जी/उत्तरमध्ये येणाऱया दादर, माहीममध्ये मेट्रो-3 चे काम सुरू असून तिथे काम करणारे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. म्हणून मुंबईच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया या कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून शनिवार, 26 डिसेंबरला शितलादेवी मंदिरासमोर मेट्रो कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यासाठी  शिबिराचे आयोजन केले आहे.