व्हॉटस्ऍपवर लवकरच ‘मल्टी डिव्हाईस सपोर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपवर लवकरच मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे ऑप्शन मिळणार असल्याची माहिती टेक ब्लॉक डब्ल्यूएबिटा इन्फोने दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार,या फिचरवर व्हॉटस्अॅपची टेस्टिंग सुरू आहे. मात्र कधीपर्यंत हे फिचर कार्यरत होईल याबाबत माहिती दिली नाही.

सध्या व्हॉट्सअॅपचे एक अकाऊंट एकाच डिव्हाईसवर ऑक्टिवेट राहू शकते. वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये एकच अकाऊंट असेल तर कॉलिंगचे फंक्शन त्यावर कसे काम करेल, यावर सध्या कंपनीचा अभ्यास सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच हे फिचर युजर्सच्या भेटीला येईल. मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे ऑप्शन चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर सपोर्ट होणार आहे.