
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. त्याशिवाय रिक्षाचे 10 हजारांचे नुकसान केले आहे. हा अपघात काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील डीपी रस्त्यावर घडला.
राजेंद्र महादेव मोरे (वय 55, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ऋतिक शंकर केंगार (वय 19, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ऋतिक टेम्पो घेउन चालला होता. डीपी रस्त्यावर भरधाव टेम्पो चालवून ऋतिकने राजेंद्रला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या राजेंद्र यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय ऋतिकने रिक्षाचालक मंगेश सोळंकी यांच्या रिक्षाला धडक देउन १० हजारांचे नुकसान केले आहे.






























































