चिमुकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडीयोत चिमुकल्याची आई एक मराठी भीमाचं गाणं गाताना दिसत असून त्यावर चिमुकला ठेका धरत तबला अगदी ताला-सुरात वाजवताना दिसतोय. या चिमुकल्याने तबल्यावर धरलेल्या ठेक्याने सर्वचजण हैराण आहेत. नेटिझन्सने त्याच्या कलेला दाद दिली असून चिमुकल्याचा भविष्यातील झाकीर असे म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका पुठला आहे हे कळले नसले तरी व्हिडीओतील संपूर्ण गोष्टी, मराठी गाणे आणि त्यासभोवतालचे वातावरण पाहून हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज आहे.































































