
देवगड तालुक्यात होऊ घातलेल्या 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दाखल झालेल्या 405 उमेदवारी अर्जापैकी गढीताम्हणे प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण गटातील एक अर्ज अवैध ठरल्याने 23 ग्रामपंचायतींच्या 189 जागांसाठी 404 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 4 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याची माहिती तहसीलदार मारुती कांबळे यांनी दिली.
देवगड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या 189 जागाकरिता 405 उमेदवारी अर्ज बुधवारपर्यंत दाखल झाले होते. त्यापैकी 1 अर्ज अवैध ठरला असून 404 अर्ज वैध आहेत.तहसीलदार मारुती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार जि .के.सावंत,वरिष्ठ लिपिक महेश चव्हाण,महसूल सहाययक ए. ए. गिरी महसूल कर्मचारी 23 निवडणुक निर्णय अधिकारी निवडणुकीची जबाबदारी पार पाडीत आहेत. बुधवारपर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये मोंड 16,तांबळडेग 15,कोरले 14,मिठबाव 20, मुटाट 19 ,धालवली 14, रहाटेश्वर 8 ,लिंगडाळ ,23,कातवण 14,गंढिताम्हणे,14 पैकी 1 अवैध ठरल्याने गंढिताम्हणे ग्रामपंचायतीसाठी 13 अर्ज आहेत.
तसेच पुरळ 25, मुणगे 21 ,मोडपार 8, इळये 19,,कुणकेश्वर 29,टेंबवली 10,तळवडे 21,नाडण 18,,पाटथर,11,पाळेकर वाडी 13, वरेरी,18,वाडा 23, शिरगाव 32,,रहाटेश्वर 8 असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. देवगड तालुक्यात एकूण 23 ग्रामपंचायातींच्या निवडणुका होत आहेत. यात एकूण 71 प्रभाग असून 189 सदस्य आहेत.या निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीत देवगड तालुक्यातील कातवण,टेंबवली, पाटथर, धालवली, कोरले, पाळेकरवाडी, गंढिताम्हणे,रहाटेश्वर, मोंड,तांबळडेग लिंगडाळ, मुणगे, मिठबाव, इळये, कुणकेश्वर, वाडा, मुटाट,नाडण,मोंडपार,वरेरी,तळवडे,पुरळ, शिरगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
























































