फास्टटॅगला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनांना फास्टॅग लावण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी दीड महिन्यांची मुदतवाढ दिली. याआधी 1 जानेवारीची डेडलाईन दिली होती. ती संपण्याआधीच 15 फेब्रुवारीपर्यंत वाढीव मुदत देऊन सरकारने चारचाकी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. राष्ट्रीय महामार्गांवर धावणाऱया 100 टक्के चारचाकी वाहनांवर फास्टॅग प्रणाली बसवण्यात यावी, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) विभागीय अधिकारी अब्दुल बासित यांनी सांगितले.