आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतील (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया उद्या, 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती तसेच प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर शुल्क जमा करणे यासाठी 4 जानेवारी 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

5 जानेवारी 2021 रोजी गुणवत्ता यादी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याबाबत उमेदवारांना एसएमएसद्वारेही कळवण्यात येणार आहे. रिक्त जागा या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध असणार असून त्यांचा तपशील 2 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनासाठी बोलवणे आणि त्याच्या अर्हतेप्रमाणे जागांचे वाटप करणे आदी कार्यवाही 6 आणि 7 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचे संचालनालयाने कळवले आहे.