राम मंदिरासाठी कॉंग्रेस नेत्याने सुरू केली निधी गोळा करण्याची मोहिम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी विविध भागातून निधी संकलन अभियान राबविण्यात येत आहे. यात आता कॉंग्रेस नेत्यांनीही पुढाकार घेतला आहे. कॉंग्रेसचे सचिव विवेक खंडेलवाल यांनी गेल्या तीन दिवसात 70 हजार एवढी रक्कम केली आहे.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी राम मंदिर उभारणीसाठी निधी जमवण्यासाठी आवाहन केले होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी इच्छा होती, असे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग बोलले होते. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी पुढाकार घेत राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याची मोहिम सुरू केली आहे.

मध्य प्रदेश कॉंग्रेसचे सचिव विवेक खंडेलवाल यांनी गेल्या तीन दिवसात 70 हजार एवढी रक्कम जमवली आहे. ही मोहिम जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहिल. जमवलेली रक्कम अयोध्येत जाऊन श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टला देणार असल्याचे खंडेलवाल सांगतात. ते त्यांच्या पक्षाच्या परवानगीनेच निधी गोळा करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसचे प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी ही मोहीम खंडेलवाल एक राम भक्त म्हणून व्यक्तीगत स्तरावर करत असल्याचे सांगितले.