
सेलू तालुक्यातील देवला पुनर्वसन येथील ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने गावा 15 दिवसापासून अंधारात आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, दळणासह इतर सुविधा मिळू शकल्या नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे दीडशे फूट केबल उपलब्ध नसल्याने विद्युत पुरवठा सुरू होण्याची शक्यता जवळपास कमीच आहे.
लोअर दुधना धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेले गावाचे पुनर्वसन झाले. परंतु समस्या मात्र आजही कायम आहेत. साध्या रोहित्रासाठी ग्रामस्थांना शासकीय ते राजकीयाकडे खेटे मारून देखील 15 दिवसापासून देवला पुनर्वसन गावातील अंधार दूर झाला नाही. अशी संतापजनक व्यथा देवला पुनर्वसन येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या आहेत.
गावात विद्युत पुरवठा करणार्या रोहित्राचे 3 गट्टू एक-एक करून दिवाळीपासून निकामी होत गेले. शेवटचा रोहित्राचा गट्टू पंधरा दिवसांपूर्वी बंद पडला. तेव्हापासून रहिवाश्यांनी सर्व राजकीय पुढार्यांचे आणि वीज वितरण अधिकार्यांचे उंबरठे झिजवले. परंतु गुरुवार पंधरा दिवसानंतर रोहित्राचे 3 गट्टू बसविण्यात आले. मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे दीडशे फूट केबल उपलब्ध नसल्याने विद्युत पुरवठा सुरू होण्याची शक्यता जवळपास कमीच आहे. असे ग्रामस्थांनी बोलून दाखवले. दरम्यान, पंधरा दिवसांपासून येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, दळणासह इतर सुविधा मिळू शकला नाही.
देवला गावातील ट्रान्सफार्मर बंद झाल्याने संपूर्ण गावाचा खंडित झालेला विजपुरवठा गुरुवारी सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया वीज वितरणचे उपअभियंता मुंजाजी अरगडे यांनी दिली.
मागील पंधरा दिवसांपासून देवला येथील रोहित्राचे गट्टू जळाल्याने वीजपुरवठा 15 दिवसापासून बंद होता. ग्रामस्थानी विज पुरवठा बंदच्या कालावधीत राजकीयनेते ते शासकीय अधिका-याचे उंबरठे झिजवले पण वीज पुरवठा सुरू झाला नसल्यामुळे संतप्त व्यक्त करून गुरुवारी रोहित्र फूट केबल नसल्याने वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ शंकर लाटे यांनी दिली.



























































