
राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’चे आरक्षण (सामाजिक व शैक्षणीक मागास प्रवर्ग) न ठेवता त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून लाभ मिळावा, असा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता. मात्र एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा मिळावा म्हणून राज्य सरकार नवीन जीआर काढणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’चे आरक्षण (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) न ठेवता त्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून लाभ मिळावा, असा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता.
‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाईल तसेच जे उमेदवार अटी आणि शर्तींची पूर्तता करतात त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा जीआर 4 जानेवारी 2021 प्रसिद्ध केला होता.
मात्र 4 जानेवारीचा हा जीआर रद्द केला, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस शिपाई भरती 2019साठी ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना आरक्षणाचा फायदा देण्यासाठी सुधारित जीआर गृह विभागाकडून लवकरच जारी करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.



























































