डेब्रिज टाकून कांदळवनाचे नुकसान करणाऱ्य़ांवर कारवाई करा! पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदळवनावर डेब्रिज टाकून त्याचे नुकसान करून पर्यावरणाची हानी करणाऱ्य़ांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिले.

कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी सहय़ाद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कांदळवनाचे एपीसीसीएफ वीरेंद्र तिवारी, सीसीएफ अरविंद आपटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कांदळवनाचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे किंवा या क्षेत्राचे फेन्सिंग करणे, संरक्षणासाठी सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांचा वापर करणे, वन कर्मचाऱ्य़ांना आवश्यक सेवा-सुविधा देणे आदी उपाययोजनांवर भर देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.