कोण होणार सरपंच? 12 हजार 711 ग्रामपंचायतींचा आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच गाव पातळीवर निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह आहे. तब्बल 79 टक्के मतदान झाल्यानंतर आता वेळ आहे निवडणूक निकालाची. राज्यातील 34 जिह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. कोण होणार सरपंच, कुणाचे किती सदस्य निवडून येणार याचा निकाल उद्या मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे.

राज्यात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णतः तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे अंतिमतः 12,711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता उद्या सोमवारी 18 जानेवारीला या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे. तब्बल 2 लाख 14 हजार उमेदवारांपैकी कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आज स्पष्ट होईल.

राज्यात कोणत्या जिह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, नगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, संभाजीनगर- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, धाराशिव- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले.