राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धेत सत्यम, जयेश, सुमित, दीपक, वैभवची झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगासन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धेत पंतनगर मनपा इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी केली. सत्यम मिश्रा, जयेश मेवाडा, सुमित त्रिमुखे, दीपक सिंग यांनी आपआपल्या गटांत पहिला तर वैभव दुबे याने दुसरा क्रमांक मिळवला. या पाचही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र, मुंबई संघामध्ये निवड झाली आहे.

प्रशासकीय अधिकारी ज्योती बकाणे, वरिष्ठ पर्यवेक्षक रामेश्वर लोहे, राजेश घाडगे, प्राचार्य रवींद्र परदेशी, अलका शिवदे, अनिल सनेर, मुख्याध्यापिका सुमन सिंग यांच्याकडून विजयी विद्यार्थी व शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.