
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. त्रालमधील मंदूरा गावातील एका घरात हे दहशतवादी लपले होते.
Jammu and Kashmir: Three terrorists killed in the ongoing operation at Mandoora Tral area of Awantipora.
(visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/fpM5KGyvJP
— ANI (@ANI) January 29, 2021
मंदूरा गावातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानंतर या गावात शोधमोहिम सुरू करण्यात आली. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र दहशतवाद्यांनी तसे न करता गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
मारले गेलेले तीनही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे होते. आऱीफ शेख, वारीस भाट, एहतीशामुल हक अशी त्या तिघांची नावं असून ते तिघेही पुलवामातील रहिवासी होते.




























































