मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 557 दिवसांवर, दिवसभरात 589 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 589 कोरोनामुक्त झाले तर 494 जणांना कोरोना झाला. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 557 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 334 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 90 हजार 400 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 557 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 417 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 27 लाख 73 हजार 167 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 8 हजार 57 वर पोहोचली आहे.

राज्यात दिवसभरात 2,613 जण कोरोनामुक्त

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात शुक्रवारी दिवसभरात 2 हजार 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.28 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 2 हजार 771 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 56 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.53 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 44 लाख 96 हजार 359 चाचण्या झाल्या असून 20 लाख 21 हजार 184 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 95 हजार 127 जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 771 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.