शहरात घरफोडीचे सत्र कायम; औंध, येरवडा, लोहगावमध्ये घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी औंधमधील पुष्पक पार्क सोसायटी, येरवड्यातील लक्ष्मीनगर आणि विमानतळमधील अंबिकानगरमध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे.

औंधमधील वसुमती सोसायटीतील एका जेष्ठ महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाईल आणि रोकड असा मिळून 7 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घरातून तीन मोबाईल आणि चांदीचे ब्रेसलेट असा मिळून 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी महेश गवळी (वय 35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही, गॅसशेगडी, असा मिळून 1 लाख 34 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लोहगावमधील दत्तनगरमध्ये घडली. याप्रकरणी शिवचंद्रा प्रसाद (वय 32) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गांधले अधिक तपास करीत आहेत.